कारणराजकारण

Dropadi Murmu Oath Ceremony : भारताचे राष्ट्रपती 25 जुलैलाच शपथ का घेतात?

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. तसंच कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात.

द्रौपदी मुर्मू (Dropadi Murmu) यांची अखेर राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. मुर्मू यांच्या रुपाने भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत. (Second Women President For India) त्यांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.

मूर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा उमेदवार होते. अखेर मूर्मू यांचा विजय झाल्याने त्या राष्ट्रपती पदाची शपथ 25 जुलै रोजी दिल्ली येथे घेणार आहेत. (President Oath Ceremony) राज्य घटनेच्या कलम 52 नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केली असून राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. तसंच कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात.

यावेळेस देखील राष्ट्रपतींचा शपथ विधी 25 जुलै रोजी पार पडत आहे. देशाच्या राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा यापूर्वीही अनेकदा याच तारखेला झाला आहे. राष्ट्रपती 25 जुलैलाच शपथ घेतात, ही परंपरा भारतात अनेक वर्षांपासून सुरू आहे.

आतापर्यंत देशाच्या एकूण 9 राष्ट्रपतींनी 25 जुलै रोजी शपथ घेतली आहे. भारतात राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. दर पाच वर्षांतून एकदा, लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात.

दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजी देशाला एक नवीन राष्ट्रपती मिळतो. ही मालिका 1977 पासून सुरू झाली जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे त्यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी 1977 मध्ये निधन झाले. तेव्हा त्यांच्या निधनानंतर उपाध्यक्ष बी.डी. जत्ती हे कार्यवाहक राष्ट्रपति अध्यक्ष झाले. त्यानंतर नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ला राष्ट्रपती बनले. तेव्हापासून दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपतो तर नवनिर्वाचित राष्ट्रपती शपथ घेतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments