राजकारण

आदित्य ठाकरेंचा पुढचा प्लॅन ठरला, आता नगरसेवकांची वेळ…

जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा सगळ्यांपर्यंत पोहचण्याचा घाट आदित्य ठाकरेंनी घातला आहे.

Aaditya Thackeray Next Plane : एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे घराण्याला चॅलेंज दिल्यामुळे अख्ख्या शिवसेनेला प्रॉब्लेम झालाय. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज देण्यामागे ते सांगत असलेले कारण आहे की अजून काही, हे सांगणं थोडं कठीण आहे. मात्र यामुळे ठाकरे घराण्याचा पुन्हा संघर्षाचा काळ सुरु झालाय, हे नक्की. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा असो की शिवसंवाद यात्रा, हे त्याच संघर्षाचे संकेत आहेत.

ज्या मतदार संघातील आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, त्याच मतदार संघामध्ये जाऊन आदित्य ठाकरे यांनी मेळावे घेतले, अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा सगळ्यांपर्यंत पोहचण्याचा घाट आदित्य ठाकरेंनी घातला. आता या सगळ्यात अजून एक मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे मुंबई पालिकेची निवडणूक.

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईमध्ये कोणीच नगरसेवक पदावर नाही, कोणी महापौरही नाही, मात्र या सगळ्यात काही दिवसांपूर्वी नगरसेवक पदाचा कारभार सांभाळणारे शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या बाजूने आहेत.

ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण अशा अनेक ठिकाणाच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र मुंबईमध्ये तसं होताना दिसलं नाही, मुंबईमधील सेना आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांनी आतापर्यंत एकनाथ शिंदेंना साथ दिली. यशवंत जाधव हे मुंबई पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.

मुंबई पालिकेत गेल्या टर्ममध्ये शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून गेले होते, आता तेच नगरसेवक किंवा त्यांच्या जागी इतर कोणी असलेल्या दावेदाराला निवडून आणण्याचं चॅलेंज ठाकरे गटाकडे असणार आहे.

मागच्या पालिका निवडणूक टर्ममध्ये जे नगरसेवक निवडून आले होते, आता त्यांच्याच भेटीगाठी घेण्याचा निर्णय आदित्य ठाकरे घेणार असल्याचं दिसून येत आहे. मुंबई पालिका निवडणुकीचं नियोजन कसं असेल, लागू होणारं आरक्षण, निवडून येण्याची शक्यता, वार्डांची रचना अशा सगळ्या पद्धतीने माजी नगरसेवकांशी चर्चा होऊ शकते. त्यामुळे निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रा आणि आता पुढे काय, असा सवाल फक्त राजकीय लोक नाहीत, तर विरोधी पक्षांपासून शिवसैनिकांच्याही मनात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments