एकदम जुनंनॉलेज

Mumbai History : …आणि आगीने बदलला मुंबईचा चेहरामोहरा

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबई म्हणजे निवळ एक किल्ला होता. या किल्ल्याच्या बाहेर माझगाव, भायखळा, माहीम, माटुंगा वगैरे अनेक गावे पसरले होती.

Mumbai History : ‏मुंबईत आता अनेक वेळा आग लागते. पालिकेने संबंधित इमारतींना आणि रहिवाशांना नोटीस देऊन देखील इमारतीखाली न केल्यामुळे लोकांना अतोनात जीव गेल्याचे चित्र मुंबईत पाहिललं आहे. पावसाचे प्रमाण वाढले की शॉर्टसर्किटमुळे मुंबईत आग देखील होण्याचे प्रमाण वाढतं किंवा इतर कारणांमुळे देखील मुंबई मध्ये आग लागते. आणि हे मुंबईकरांसाठी धोकादायक आहे परंतु एकेकाळी मुंबईमध्ये आग लागल्यानेच मुंबईचे चेहरा मोहरा बदलला असल्याचे चित्र आहे.

मुंबईत पहिला बदल झाला तो एकोणिसाव्या शतकात आणि ह्यामुळे एकंदर चेहरामोहराच बदलून गेला. ह्याला जे कारण घडले ते भयानक होते. 17 फेब्रुवारी 1803 रोजी किल्ल्याच्या आत एक मोठी आग लागली आणि शेकडो घरे त्या आगीत उध्वस्त झाली. आग्नेय दिशेने बाजाराच्या बाजूने येणारी आग वाऱ्यामुळे सर्व बाजूंना पसरली. संपूर्ण दिवस आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. रात्री केव्हा तरी ही आग आटोक्यात आली, तोपर्यंत 417 घरे, 6 देवळे आणि सैनिकांच्या 5 छावण्या असा तत्कालीन मुंबईचा जवळपास एक तृतीयांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. (Fire In Mumbai)

त्या वेळच्या मुंबई सरकारने ताबडतोब पुनर्रचनेचे काम हाती घेतले आणि कायापालट करण्याचा चंग बांधला. आगीच्या पूर्वी किल्ल्याच्या तटबंदीच्या आत लोक बांधून राहत होते. आता त्यांना किल्ल्याच्या बाहेर राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी खुद्द मुंबई सरकारने आपल्या काही कार्यालय आणि गोदामांच्या इमारती किल्ल्यातुन हलवले. ह्या वेळेपासूनच लोकांनी मलबार येथे घरे बांधण्यास सुरुवात केली.

ही जबरदस्त आग लागण्याच्या आधीची मुंबई आजच्यापेक्षा फारच वेगळी होती. लांबीला अपोलो गेट ते बझार गेट म्हणजे जवळजवळ एक मैल आणि चर्चगेट ते बंदर किंवा आजचा फोर्ट. म्हणजे मुंबई पालथी घालायला त्या वेळी तासभर देखील लागत नव्हता. मुंबईची सात बेटे एकमेकांना जोडण्याचे काम देख पुरे झाले नव्हते.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबई म्हणजे निवळ एक किल्ला होता. या किल्ल्याच्या बाहेर माझगाव, भायखळा, माहीम, माटुंगा वगैरे अनेक गावे पसरले होती. किल्ल्याच्या बाहेरील नारळीच्या वनात ब्लॅक टॉवर उभा होता. गिरगाव व भुलेश्वर हे भाग या नारळीनी वेढलेले होते. मलबार हिल हा भाग म्हणजे एक घनदाट जंगल हो आणि त्यामुळे शिकारी लोकांना हा भाग म्हणजे कुरणच होते.

येथे कोल्हे आणि तरस यांची वस्ती होती. काही वेळा यार वाघ देखील मुक्काम ठोकून असे इथले कोल्हे किल्ल्यापर्यंत येत असत. त्यावेळी एक कोल्हा हायकोर्टाच्या आवारात पोचला, पण कोर्टाची पायरी चढण्या पूर्वीच लोकांनी त्याचा निकाल लावला होता. त्याच काळात बॅकबे वर भर घालून जमीन बनवलेली नव्हती. तिथला किनारा त्यावेळी मोकळा होता आणि बाजूला झाडी होती. त्यावेळचा हा रमणीय आणि नैसर्गिक भाग म्हणजेच आजचा मरीन ड्राईव्ह. चौपाटीला त्यावेळी लकडी बंदर म्हणत आता चौपाटी चा किनारा आणि बँड सटाणा भागात ओढ्यातून येणारे लाकूड उतरवले जाईल हे लाकूड त्यावेळी ताडदेवला झालेल्या नवीन कापड गिरण्यांना पुरवले जाई पुढे हा भाग जहाज वाहतूक बंद करण्यात आला तसेच हे लकडी बंदर ही बंद झाले आणि त्याची चौपाटी बनली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments