एकदम जुनं

Balasaheb Thackeray Family : ठाकरेंची ही वंशावळ तुम्हालाही माहित नसेल! बाळासाहेबांच्या मुलांपासून 8 नातवांपर्यंत सर्व माहिती!

प्रबोधनकार ठाकरे यांचे पाचवे पुत्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे यांचा एकूण 9 मुले.

दिवंगत शिवसेनाप्रमुख आणि मराठी माणसाची झणझणीत तोफ म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Family) यांच्या नावाशी जोडलेला प्रत्येक घटक, व्यक्ती चर्चेचा विषय ठरतो. बाळासाहेब ठाकरेंचे नातू निहार ठाकरे यांनीp मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला. यावरून बाळासाहेबांचा नातू म्हणून निहार ठाकरेंच नाव चर्चेत आलं. अनेकांना हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ठाकरे परिचित आहेत, मात्र ठाकरे घराण्याची वंशावळ फार मोठी आहे, आणि याच वंशावळीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

प्रबोधनकार ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे

प्रबोधनकार ठाकरे यांचे पाचवे पुत्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे यांचा एकूण 9 मुले. बाळासाहेब ठाकरेंचा 2 भाऊ आणि 5 बहिणी. भाऊ रमेश ठाकरे, श्रीकांत प्रबोधनकर ठाकरे आणि बपमा टिपणीस, सुधा सुळे, सरला गडकरी, सुशीला गुप्ते, संजीवनी करंदीकर या पाच बहिणी.

बाळासाहेब ठाकरेंची वंशावळ

स्वतः बाळासाहेब ठाकरे पकडुन 18 जणांचं अस मोठ बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब होतं. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंना 3 मुलं झाली. मोठ्या मुलाचं नाव बिंदूमाधव ठाकरे, दुसऱ्या मुलाचं नाव जयदेव ठाकरे तर तिसऱ्या मुलाचं नाव उद्धव ठाकरे. या तीन मुलांपासून बाळासाहेबांना 8 नातवंड झाली.

बिंदूमाधव ठाकरे हे बाळासाहेबांचे मोठे चिरंजीव. त्यांचा विवाह माधवी यांच्याशी झाला आणि त्यांना 2 मुलं झाली. त्यातील एक निहार, आणि दुसरी मुलगी नेहा. चर्चेत असणारे निहार ठाकरे हे बाळासाहेबांचे पहिले नातू.

बाळासाहेबांचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरे यांनी 3 लग्न केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव जयश्री कालेकर, दुसऱ्या पत्नीचं नाव स्मिता तर तिसऱ्या पत्नीचं नाव अनुराधा. जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचं नाव जयदीप ठाकरे. स्निता ठाकरे यांना राहुल आणि ऐश्वर्य अशी दोन मुले झाली. जयदेव ठाकरेंच्या तिसऱ्या पत्नी अनुराधा यांना माधुरी नावाची एक 1 मुलगी झाली.

बाळासाहेब ठाकरेंचे तिसरे पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे. रश्मी ठाकरेंशी विवाह झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना दोन मुले झाली, मोठा मुलगा आदित्य ठाकरे जे आता आमदार आहेत आणि दुसरा मुलगा झाला तेजस ठाकरे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments