राजकारण

कधी नव्हे ते फडणवीस-शिंदेंनी करुन दाखवलं, ठाकरेंची डोकेदुखी अजून वाढली?

मुंबईमध्ये भाजपने तर BMC चा प्लॅन डोळ्यासमोर ठेऊन दहीहंडी साजरी केली

Eknath Shinde BMC Plane : शिंदे सरकारच्या काळात मुंबईमध्ये दहीहंडी साजरी झाली. तशी ती कोणाचंही सरकार असतं तरी झाली असती, किंबहुना त्या सरकारला ते करावंच लागलं असतं. कारण यावर्षी कोरोनाचं कारण सांगून दहीहंडी बंद करुन चालणार नव्हतं. अखेर दहीहंडी मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी झाली. मुंबईमध्ये भाजपने तर BMC चा प्लॅन डोळ्यासमोर ठेऊन दहीहंडी साजरी केली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या सल्लोख्याच्या नात्यातील अनेकांच्या दहीहंडीला उपस्थिती लावली.

आतापर्यंत असं पहिली वेळ घडलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही मुंबईतील अनेक दहीहंडींना उपस्थिती देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसभर कुठल्या ना कुठल्यातरी दहीहंडीला भेट देऊन तिथे भाषण करत होते. प्रत्येक भाषणामध्ये आपण केलेल्या बंडाबद्दल सांगत होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शिवसेनेतील ठाकरे गटाला डिवचण्याचं काम करत होते.

काही दिवसांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येत आहे, त्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता आणायची आहे. त्याप्रकारचं नियोजनही भाजपकडून करण्यात आलंय, असं भाजपचे नेते सांगतात. मुंबई पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला वेगळा असा काय फायदा होणार आहे, हे येणारा काळ किंवा खुद्द मुख्यमंत्री शिंदे सांगतील, मात्र एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाचा भाजपला सरळ सरळ फायदा झालाय किंवा होणार आहे, हे नक्की.

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे शिवसेनेची ताकद दुभागली आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास एका मतदार संघामध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार आमनेसामने उभे राहणार तर त्यांच्यामध्ये भाजपचा एक उमेदवार आपली मतं घेणार. याचाच अर्थ 200 मतांपैकी 100 मत भाजपला, 50 मतं ठाकरे गटातील उमेदावाराला आणि 50 मतं शिंदे गटातील उमेदवाराला मिळणार.

दहीहंडीच्या सणांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेवढी भाषणं केली त्या सगळ्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे जनतेसाठी कसे कमी पडले, हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. कधी नव्हे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी दहीहंडीमध्ये नॉनस्टॉप कार्यक्रमांना भेटी देऊन उद्धव ठाकरेंची डोकेदुखी अजून वाढली, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments