राजकारण

निवडणुकीत मनसेचं प्लॅनिंग कसं ठरलंय, शिवतिर्थाचा आदेश येऊनही वेट अँड वॉचची भूमिका का?

मनसेची फक्त वेट अँड वॉचची भूमिका नसून सत्तेत असलेल्या आणि सत्तेतून गेलेल्या पक्षांवरही त्यांची करडी नजर असल्याचं दिसून येतंय.

BMC Election 2022 :  सध्या राजकीय गोष्टींचा गुंता खूप वाढलेला दिसून येत आहे. त्यानुसार विचार केला तर फक्त ज्यांच्यामुळे हा सगळा गुंता झालाय तेच तणावात नाहीत, तर ज्यांचा या गुंतागुंतीशी तितकासा संबंध नाही, ते राजकीय पक्षही योग्य वेळेची वाट पाहत आहे. या सगळ्या पक्षांमध्ये राजकारणात महत्त्वाचा समजला जाणारा मनसे पक्षही खूप मोठ्या पेचात अडकल्याचं दिसून येत आहे.

मुंबई पालिकेची निवडणूक आली तर फक्त शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची सगळीकडे चर्चा होत होती, मात्र या शर्यतीत आता मनसेनेही दंड थोपटल्याचं दिसून येतंय, पण मनसेची फक्त वेट अँड वॉचची भूमिका नसून सत्तेत असलेल्या आणि सत्तेतून गेलेल्या पक्षांवरही त्यांची करडी नजर असल्याचं दिसून येतंय.

महाराष्ट्रात सरकार कोणाचंही असो, त्या सरकारमध्ये विचार केला जातो तो म्हणजे मनसेचा. मनसेच्या अनेक भूमिका आणि घोषणांचा महाराष्ट्रात काही प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. पण फक्त मुंबईचा विचार केला तर मनसेने आपला प्रपंच मोठ्या प्रमाणात वाढवल्याचा दिसून येतोय.

मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. तशी युती झाल्यास हा शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. 70-30 च्या फॉर्म्युल्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यानुसार भाजप आणि मनसे मैदानात उतरु शकतात, मात्र मनसेसमोर उत्तर भारतीयांचं उभे असलेलं चॅलेंजही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या विभागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे, तिथे मनसेला मोठा फटका बसू शकतो. मात्र जिथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीय जनता आहे, तिथे निवडणुकींची घोषणा होण्याआधीच मनसेने प्लॅनिंग करायचा सुरुवात केली आहे.

मनसेच्या जेष्ठ नेत्यांपासून विभाग प्रमुखांपर्यंत सर्वजण निवडणूक आयोगाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. मात्र ठाकरे सरकारानंतर आलेल्या शिंदे सरकारच्या घोषणा, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणि साल 2017 नुसार वार्डांची रचना, अशा सगळ्यांच्या पेचात इतर पक्षांसह मनसेचाही प्लॅन अडकल्याचं दिसून येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments