आपलं शहरबीएमसी

Mayor | पॉलिटिक्स समजण्यासाठी महापौर पदाचा वंटास इतिहास तुम्हाला वाचावाच लागेल…

Mayor हे नाव ब्रिटिशांनीच आपल्या दिलं आहे, ज्याला आपण मराठीत महापौर म्हणतो.

महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार आणि कोणत्या पक्षाचा महापौर (Mayor) बसणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र आज वंटास टीम तुम्हाला महापालिकेच्या मुख्य पदाच्या शब्दामागचा म्हणजेच महापौर हा शब्द नेमका कुठून जन्माला आला, हे सांगणार आहोत. याचबरोबर अनेकदा आपल्याला महापालिकेची मुख्यत्वे कोणती कामे असतात, हे देखील पाहणार आहोत.

महानगरपालिकेची स्थापना का झाली?

महापौर पदामागचा इतिहास जाणून घेण्याआधी आपण महानगरपालिकेची (MahanagarPalika Established) स्थापना का झाली, हे पाहुयात. मोठी शहरे म्हणजेच महानगरांच्या स्थानिक प्रशासनाची जबाबदारी पार पडण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीतील असल्यामुळे महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यापलीकडे महानगर पालिकेच्या सीमा निश्चित करणे किंवा सिमेत फेरबदल करण्याचा अधिकारदेखील राज्यसरकारला आहेत.

महापौर शब्दामागचा इतिहास

मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून प्रमुखाला सर्वात आधी चेअरमेन (History Of Mayor) म्हणून बोललं जायचं. पुढे सन 1888 च्या कायद्याने हे ‘चेअरमन’ बदलून पुन्हा ‘अध्यक्ष’ बनले. 1931 साली बोमन बेहराम अध्यक्ष असताना या पदावरील प्रमुखाला ब्रिटिश राजवटीशी इमान सांगणारे ‘हिज वर्शिप द मेयर’ हे नाव देण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ‘हिज वर्शिप’ बंद पडले आणि त्या शब्दातून नुसताच ‘मेयर’ हा शब्द उरला. यांनाच अलीकडे मराठीत आपण ‘महापौर’ म्हणतो. महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो.

महापौर आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांची कामं काय असतात?

1. महानगर पालिकेचे कार्यक्षेत्र निश्चित करणे, सीमा ठरवणे व त्यामध्ये बदल करणे.

2. पिण्याच्या पाण्याची तसेच वितरणाची व्यवस्था करणे.

3. जलनिस्सारण आणि निस्सारण व्यवस्था

4. शहरात दिवाबत्तीची व्यवस्था करणे.

5. शहराची साफसफाई व स्वच्छता राखणे.

6. अग्निशमन दलाची व्यवस्था करणे.

7. प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे.

8. स्मशानभूमीची व्यवस्था करणे.

9. शहरात परिवहन सेवा उपलब्ध करणे.

10. शहरातील विविध ठिकाणांना, रस्त्यांना नावे देणे वा क्रमांक देणे.

11. नागरिकांच्या जन्म – मृत्यूची नोंद ठेवणे.

12. सार्वजनिक आरोग्य व प्रसूतिगृहाची व्यवस्था करणे.

13. महानगरपालिकाचे कार्यालय व अन्य संपत्तीचे रक्षण करणे.

14. शहरातील जुन्या व धोकादायक इमारती पाडणे.

15. संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक लसी देण्याची व्यवस्था करणे.

16. मादक पदार्थ तसेच अन्य घातक वस्तुंच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे.

17. गटारी व नाल्यांची साफसफाई करणे.

18. मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करणे.

19. शहरातील पीडित, रोगी व वेड्या व्यक्ती यांच्या पालन पोषणाची व्यवस्था करणे.

20. सार्वजनिक बाजारपेठा, कत्तलखाने बांधणे तसेच त्याचे नियमन व नियंत्रण करणे,

21. शहरातील गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन करून त्यामध्ये सुधारणा करणे.

22. शहराच्या विकास आराखड्यासंबंधी नियोजन करणे.

23. शहरात सार्वजनिक रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग इ.चे बांधकाम करणे.

24. शहरात वृक्षांची लागवड आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे.

25. महानगरपालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधणे व त्याची व्यवस्था पाहणे.

असा आहे महापालिकेसह महापौर पदामागचा इतिहास. आता याच महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु असते, फक्त महापौर नाही, तर नगरसेवक पदाचाही मोठा इतिहास आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments