आपलं शहरएकदम जुनंघटना

First Women Doctor : नवऱ्याच्या कचाट्यातून मोकळी होत रखमाबाई झाली पहिली महिला डॉक्टर

आज वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजल्यावरही प्रवेश मिळेल अशी शाश्वती नाही

First Women Doctor : सन 1835 ते 1938 च्या दरम्यान सर रॉबर्ट ग्रॅण्ट हे मुंबईचे (Mumbai) गव्हर्नर होते . त्या वेळी मुंबईत एक वैद्यकीय शाळा होती. तिचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात करण्याची कल्पना या रॉबर्ट ग्रॅण्ट यांच्या मनात घोळत होती. पण त्याच्या ह्या कल्पनेला स्वरूप यायला 1845 साल उजाडले . त्या वर्षी मुंबईत पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्याला “ग्रँट मेडिकल कॉलेज” (Grant Medical College) हे नाव त्याच्यावरूनच दिले गेले.

आज आपणास कदाचित वाचून आश्चर्य वाटेल, पण त्या काळी चांगले विद्यार्थी ह्या कॉलेजला मिळावेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई सरकारने दरमहा सात ते बारा रुपये विद्यावेतन देण्याचे जाहीर केले. आज वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो रुपये मोजल्यावरही प्रवेश मिळेल अशी शाश्वती नाही. परंतु त्यावेळी मुंबईला कॉलेजमध्ये विद्यार्थी मिळत नव्हते.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी टाउन हॉलमध्ये मुंबईतल्या नागरिकांची सभा भरली. नागरिकांनी चव्वेचाळीस हजार रुपये गोळा केले. सरकारने देखील जवळजवळ तेवढीच रक्कम त्यात घातल्यानंतर इमारतीचे काम पूर्ण केले. पण जेव्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रुग्ण अनुभवासाठी संलग्न रुग्णालय उभारण्याची वेळ आली तेव्हा पैसा संपलेला होता. पुन्हा पैशाचा प्रश्न उभा राहिला. ह्या वेळी सर जमशेटजी जीजीभाई यांनी स्वखुषीने एक लाख रुपयांची देणगी दिली. ह्या वेळी देखील सरकारने ह्या देणगीत जवळपास तेवढीच आपली भर घातली. ह्या पैशाच्या व्याजावर मुंबईतल्या गोरगरीब जनतेवर उपचार करण्यात येऊ लागले. अशा तऱ्हेने ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. रुग्णालय एकाच आवारात उभी राहिली.

पहिली भारतीय स्त्री डॉक्टर मुंबईचीच निघाली. रखमाबाई नावाच्या एका मुलीचा बालविवाह झाला आणि जेव्हा तिला कळू लागले तेव्हा म्हणून तिने त्याच्याबरोबर न राहण्याचा निश्चय केला. सन 1887 मध्ये नवऱ्याने तिच्यावर कोर्टात दावा दाखल करून कोर्टाने तिला आपल्याबरोबर नांदायला भाग पाडावे. असा अर्ज केला. पण ही मुलगी फारच हिंमतवान आणि हुशार होती. त्यातच तिला तिच्या माहेरचा पाठिंबा होता. तिने हा खटला मोठ्या नेटाने लढवला. परंतु खटला जिंकला मात्र तिच्या नवऱ्याने. नंतर ह्या बाबतीत कोर्टाच्या बाहेर तडजोड झाली आणि रखमाबाईने दोन हजार रुपये नवऱ्याला खटल्याचा खर्च तेवढा देऊन नवऱ्याच्या कचाट्यातुन आपली मुक्तता करून घेतली.

त्या वेळी कामा आणि ऑल ब्लेस रुग्णालयाची पहिली मेडिकल ऑफिसर डॉ. एडिथ पेचे ही होती. ह्या बाईने रखमाबाईच्या खटल्यामध्ये विशेष रस घेतला आणि रखमाबाईला आपला नैतिक पाठिंबा दिला. रखमाबाईच्या एकंदर धैर्यावर आणि हिमतीवर ही बाई एकदम खूष झाली आणि तिने रखमाबाईला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवृत्त करून त्यासाठी इंग्लंडला पाठवले. सन 1895 मध्ये रखमाबाई एल.आर.सी.पी – एम.डी होऊन आल्यानंतर कामा हॉस्पिटलमध्ये निवासी शल्यविशारद म्हणून काम करू लागली.

आठ महिन्यांनंतर सुरतला नवीनच उघडलेल्या स्त्रियांच्या दवाखान्याची प्रमुख म्हणून डॉ. रखमाबाईंची नेमणूक केली गेली. ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी एवढ्या तन्मयतेने काम केले. आपल्या आयुष्याची पुष्कळशी वर्षे रखमाबाईंनी गुजरातमध्ये मुख्य मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले, आणि सन 1931 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्या परत मुंबईत येऊन स्थायिक झाल्या पुढे 1955 साली त्या मृत्यू पावल्या.‎

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments