राजकारण

अटकेआधी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना फोन का केला होता…

27 जुलैला देखील संजय राऊत हजर राहू शकले नाहीत, परिणामी 31 जुलैला ED चे अधिकारी स्वत:हून संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री या बंगल्यावर पोहचले.

Sanjay Raut Call To Eknath Shinde : एका बाजूला उद्धव ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे. ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सुरु झालीये. एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षप्रमुखाविरोधात बंड केलं. मात्र ते बंड इतकं मोठं झालं की प्रकरण थेट न्यायालयात पोहचलं.

एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांसह खासदारांवर अनेक आरोप केले जात आहेत. केंद्रीय संस्थांना घाबरुन अनेक आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला, अशी टीका शिवसेनेतील नेत्यांनी केली, मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेलं शिवसेनेचं एक नेतृत्व भयानक चर्चेत राहिलं, त्या नेतृत्वाचं नाव आहे संजय राऊत.

संजय राऊत यांना 20 जुलैला ईडीने समन्स बजावलं होतं. मात्र संसदेचे अधिवेशन, राष्ट्रपती निवडणुक, शिवसेनेतील बंडाळी अशा कारणाने राऊत ED समोर जाऊ शकले नाहीत, त्यांच्याबदल्यात त्यांचे वकील गेले आणि त्यांनी चैकशीसाठी मुदत वाढवून मागीतली, ती मुदत 27 जुलैपर्यंत दिली. 27 जुलैला देखील संजय राऊत हजर राहू शकले नाहीत, परिणामी 31 जुलैला ED चे अधिकारी स्वत:हून संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री या बंगल्यावर पोहचले.

31 जुलैरोजी दिवसभर चौकशी झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस संजय राऊतांना जबाब नोंदवण्यासाठी ED च्या कार्यालयात नेलं. तिथं पुन्हा त्यांची चौकशी झाली. आणि त्याच रात्री संजय राऊत यांना ED ने अटक म्हणून घोषित केलं. दुसऱ्यादिवशी म्हणजे 1 ऑगस्टला PMLA न्यायालयाने कोठडी सुनावली. 8 दिवस ED कोठडीत असलेल्या संजय राऊतांना अखेर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.

आता या सगळ्यात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दी लल्लनटॉपच्या नेतानगरी या कार्यक्रमात बोलताना पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक किस्सा सांगितला आहे. जेव्हा संजय राऊत यांच्यावर कारवाई होत होती, तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांना फोन केला होता, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचंही नाव होतं, मात्र सगळ्या नेत्यांकडून अमित शाह यांचं नाव पुढे येत होतं. त्यानंतर राऊतांनी अमित शहांना फोन केल्याचं म्हटलं जातंय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments