राजकारण

चक्क शाहरुख खान बाळासाहेबांची भाषणे ऐकायचा आणि मीडियासमोर बोलायचा…

अनेक मसालेदार आणि धमाकेदार चित्रपट देऊन शाहरुख खानने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

Shahrukh Khan : तुम्हाला योग्य वाटेल की अयोग्य, हे सांगता येणार नाही, पण आमच्यानुसार तरी अमिताभ बच्चन यांनीच बॉलिवूडला सुवर्ण काळ मिळवून दिलाय. अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूडला खरं शिखरावर नेलं ते म्हणजे शाहरुख खानने. अनेक मसालेदार आणि धमाकेदार चित्रपट देऊन शाहरुख खानने आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

हाच शाहरुख खान कधी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिला, तर कधी तो त्याच्या धर्मामुळे चर्चेत राहिला. जेव्हा शाहरुख खानचं करिअर समोर येत होतं, तेव्हा हिंदू-मुस्लिम वादालाही चांगलाच रंग चढला होता. शाहरुखसोबत सलमान खान, अमित खान असे कलाकारही चर्चेत होते, मात्र शाहरुख खानची वेगळीच ओळख होती.

जेव्हा शाहरुख खानच्या करिअरची सुरु झाली, तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं राजकारणात वर्चस्व होतं. फक्त राजकारणातच नाही, तर मनोरंजन क्षेत्रातही बाळासाहेबांच्या शब्दाला मोठी किंमत होती. हीच किंमत शाहरुख खानलाही टिकवून ठेवावी लागायची.

एका कार्यक्रमात शाहरुख खानने बंदुकीवरुन राडा घातला होता, तो पोलिसांचंही ऐकण्यास तयार नव्हता, मात्र बाळासाहेबांच्या फोननंतर शाहरुख शांत झाला होता, यावरुन बाळासाहेबांचा मनोरंजन क्षेत्रात किती दबदबा होता, याची कल्पना तुम्हाला आली असेल. शाहरुख खाननेही मुव्हिज टॉकिजच्या एका कार्यक्रमात बाळासाहेबांबद्दल एक विधान केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं मी नेहमी ऐकतो, त्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा एक अजेंडा असतो. अनेक व्यक्ती माझ्या विचारांना मानतात, तर मीही बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करतो. देशातील प्रत्येक व्यक्तीने सल्लोख्याने रहावं, असं बाळासाहेब म्हणायचे आणि मीही तेच म्हणतो, ते जेष्ठ नेते आहेत, त्यांचं ग्राऊंड वेगळं आहे आणि माझं मैदान वेगळं आहे. ते माझ्यावर टीका करतात, म्हणजे मला ते सिरीअस घेतलं पाहिजे, त्यावर मी व्यक्त झालो पाहिजे असं नाही, मी कोण आहे, मला माहिती आहे, असं मत शाहरुख खानने मुव्हिस टॉकिजच्या कार्यक्रमात मांडलं होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments