आपलं शहरएकदम जुनं

UP Bihari Migrants | ‘भय्ये’ शब्दाच्या उगमापासून ते मुंबईत भय्ये नेमके आले कधी? हा इतिहास तर वाचलाच पाहिजे!

मुळात मुंबई आणि उत्तर भारताचा संबंध गेली 2000 वर्षांपासून येतोय.

निवडणुका तोंडावर आल्या की उत्तर भारतीय ‘भय्ये’ राजकारणीयांचा भाषणातला आणि मुंबईकरांचा नाष्ट्यासोबत चर्चेचा विषय बनतो. अनेक राजकारणी उत्तर भारतीय नागरिकांना भय्ये (UP Bihari Migrants) म्हणून हिणवत मुंबईच्या बेरोजगारीपासून सुविधांच्या कमतरतेसाठी दोष देतात. मात्र मराठी माणसाच्या मुंबईत भय्ये हा घटक आला तरी कधी? आणि मुंबईकर त्यांना भय्ये म्हणूनच का बोलू लागले? हेच आपण आज या बातमीतून समजून घेणार आहोत. (History About Uttar Pradeshi and Bihari migrants attack in Mumbai)

उत्तर भारतीय मुंबईत नेमके कधी आले?

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांच्या कानावर सतत ‘यूपी वाले भय्ये’ हे कानावर पडत आहे. त्यावरून आपल्याला वाटतं की उत्तर भारतीय लोकांची (UP Bihari Migrants In Mumbai) संख्या गेल्या काही वर्षांमध्येच वाढली आहे. मात्र तुम्हाला सत्यता माहित आहे का? मुळात मुंबई आणि उत्तर भारताचा संबंध गेली 2000 वर्षांपासून येतोय. यावर अधिक माहिती देताना मुंबईच्या महाविद्यालयात एन्शंट इंडियन कल्चर आणि आर्किओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सूरज पंडित सांगतात, मुंबईवर आणि महाराष्ट्राच्या भूभागावर अनेक शतके उत्तर भारतीय सत्तांचा ताबा होता. नालंदा विद्यापीठ आणि मुंबईचे संबंध असल्याची माहितीही ते देतात.

बंगाल आणि बिहारशी मुंबईचे प्राचीन संबंध असून त्या काळापासून मुंबईत व्यापाऱ्यांचं येणं सुरू झालं. त्यावेळी बंगाल, बिहारचे व्यापारी व्यावसायासाठी मुंबईत येत काही वर्ष राहत तर त्यातील अनेक व्यापरी मुंबईत स्थायिक होत.

त्यामुळे स्थायिक झालेल्या अनेकांच्या पिढ्या मुंबईत राहत गेल्या. आताचे वास्तविक चित्र पाहता, अनेक उत्तर भारतीय लोक सांगतात, आमच्या अनेक पिढ्या मुंबईत राहिल्या, अनेकांचा जन्म इथे झाला तरी देखील आम्हाला स्थलांतरित लोकं म्हणून वागणूक मिळते.

 मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी

कॉस्मोपॉलिटन शहर म्हणजे जिथे जगाच्या विविध भागांतील लोक एकत्र राहतात, वेगवेगळ्या भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचे पालन केले जाते. म्हणजेच विविध वंश, धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींच्या लोकांचे स्वागत करणारे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या आजूबाजूला असणारा परिसर व्यापारामुळे मुंबई आधीपासूनच कॉस्मोपॉलिटन शहर ठरत होती. कल्याण, ठाणे, नालासोपारा ही बंदरं मुंबईच्या परिसरामध्ये असल्यामुळे व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यांच्यानंतर कलचुरींच्या माध्यमातून राष्ट्रकूट, यादव, शिलाहार अशा राजवटी बदलत गेल्या. नंतरच्या काळात अरबही आले. त्यामुळे मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी बनली.

उत्तर भारतीयांना भय्याचं का बोलतात?

सुरुवातीच्या काळात मुंबई परिसरात म्हशींचे तबेले मोठ्या प्रमाणत चालायचे. त्यावेळी तबेल्यातच राहणारे भय्ये (Bhaiyya In Mumbai) दूध विकण्याचं मुख्य काम करायचे. कालांतराने मुंबईचा विकास होत गेला आणि हळूहळू तबेले शहराच्या बाहेर फेकले जाऊ लागले. त्यानंतर जागेला सोन्याची किंमत आल्याने तबेले जागेच्या किमतींमुळे हटवले जाऊ लागले. त्यानंतर मुंबईत कोठूनही आलेल्या उत्तर भारतीयाला ‘भय्या’ असं संबोधल जाऊ लागलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments