राजकारण

भाजपने BMC वर पाणी सोडलं? आशिष शेलार, प्रसाद लाडांचं नियोजन कसं असणार…

राज्यात सत्ता असली की त्या पक्षाला इतर निवडणुकांमध्ये मैदान मारणं सोप्प जातं, हा राजकारणातला फॉर्म्युला समजला जातो. आता हाच फॉर्म्युला भाजपने वापरला का, असा सवाल केला जातो.

BMC Election 2022 : एखाद्या निवडणुकीत आपलं नाणं खणखणीत ठेवायचं असेल, तर वरच्या पातळीवर सत्ता असणं खूप गरजेचं आहे. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास अनेक महानगर पालिका, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता यायची असेल तर राज्यपातळीवर मोट बांधणं गरजेचं आहे. राज्यात सत्ता असली की त्या पक्षाला इतर निवडणुकांमध्ये मैदान मारणं सोप्प जातं, हा राजकारणातला फॉर्म्युला समजला जातो. आता हाच फॉर्म्युला भाजपने वापरला का, असा सवाल केला जातो.

अनेक पत्रकारांमध्ये अशा चर्चा असतात की, जरी शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केली असली तरी भाजप सत्तेत आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपला बळकटी मिळायला सुरुवात झाली. भाजप हा प्रत्येक गोष्टीचा प्लॅन करुन पुढे चालणारा पक्ष आहे, त्यामुळे राज्यात सत्तेत येणं हादेखील मोठ्या गोष्टींचा प्लॅन आहे, हे राजकारणातील नेत्यांनी आतापर्यंत समजून घेतलं असेल.

अडीच वर्षाची सत्ता, त्यात मुख्यमंत्रीपदही आपल्याकडे नाही, मात्र सत्तेत असणं किती महत्त्वाचं आहे, हे भाजपच्या वरिष्ठांनी चांगलं समजून घेतलं असावं. 2024 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्यके सामान्य नागरिकांपर्यंत भाजपला पोहोचायचं असेल, तर सत्तेत असणं हे गरजेचं आहे.

आता 2024 हे खूप लांब राहिलं, त्याआधी म्हणजेच उद्या-परवा अनेक महापालिकांची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यातच महत्त्वाची समजली जाणारी मुंबई पालिकेची निवडणूक. मुंबई पालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तिच सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्लॅन बी तयार केलाय, त्यातलाच एक भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन करणे.

मुंबई पालिकेपासून शिवसेनेला दूर ठेवणं, हे भाजपचं महत्त्वाचं उद्दिष्ट्य आहे. अनेकदा भाजपच्या बड्या नेत्यांनी ते बोलूनही दाखवलं आहे. आता याच पालिकेची जबाबदारी आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्याकडे देण्यात आलेय. मात्र असं असताना शिवसेनेचा ओरिजनल वोटर (खऱ्या आणि मराठी मतदाराला) तोडणं भाजपला जड जाणार आहे.

मुंबईमध्ये अजूनही सामान्य नागरिकांमध्ये मराठीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चालत असतो. त्यात शिवसेनेला डिवचणाऱ्या पक्षाला पालिकेमध्ये मोठी किंमत चुकवावी लागते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आता भाजपनेही तेच केलंय. भाजपने शिंदेंना आपल्याकडे खेचून उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलंय, पण यामुळे मुंबईतील मराठी जनता, शिवसैनिक आणि काही प्रमाणात परप्रांतियांची सहानभुतीही ठाकरेंच्या बाजूने गेल्याचं दिसून येतंय.

शिंदेंना शिवसेनेतून फोडून भाजपने BMC वर पाणी फेरलंय का, असा सवाल आता समोर येऊ लागला आहे. मात्र भाजपच्या निवडणुकीच्या यंत्रणेचं काय नियोजन असणार, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments