
Flag of India : भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली याच पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत शनिवार पासून सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत संपूर्ण मुंबई (Mumbai) महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने देशात घरोघरी तिरंगा महोत्सव राबवण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून, भारतात दरवर्षी या दिवशी (Indian Independence Day) स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध संस्थांमध्ये परेडचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ध्वजारोहणही केल जात आहे.