आपलं शहरएकदम जुनंकारणनॉलेज

Mumbai History : मुंबईतील लोहार चाळ, भेंडी बाजार, गुलालवाडी ही नावं मुंबईत आली कुठून? काय आहे इतिहास?

काही जागांची नावे तेथे राहणाऱ्या एखाद्या नावाजलेल्या कुटुंबामुळे किंवा जमातीमुळे देखील दिली गेली आहेतनावं

Mumbai History : मुंबईत काही स्थानकांना (Mumbai’s Railway Station) आणि काही रस्त्यांना इंग्रज अधिकारी अथवा इंग्रज गव्हर्नर यांची नावे दिली आहेत याचा इतिहास याअगोदर देखील आपण पाहिला आहे. त्याचपद्धतीने मुंबईत काही बाजारातील भागांना देखील वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात आहे. त्याच्या नावाचा इतिहास काय आहे पाहुयात… (What is the history of Mumbai names?)

मशीद बंदर (Masjid Bunder) येथील लोहार चाळ. लोहार चाळ हे नाव तेथे असणाऱ्या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले. तसेच फोर्ट येथील दलाल स्ट्रीट हे शेअर मार्केटचा (Share Market) व्यवहार बघणाऱ्या दलाल लोकांवरून सुरू झाले. माणसाच्या शरीराला शेवटी लागणाऱ्या चंदनाच्या लाकडाची दुकाने ज्या जागेवर होती तो धोबीतलावच्या अलीकडील भाग चंदनवाडी म्हणून आजही ओळखला जातो. सर हेन्री प्रॉक्टर ह्या बाँबे चेंबर ऑफ कॉमर्सच्या ब्रिटिश अध्यक्षावरून प्रॉक्टर रोड हे नाव देण्यात आले मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ह्यूजेस, मेरवेदर आणि जनरल जे. एच. बॅलाई ह्या तीन अध्यक्षांची आठवण देखील मुंबईकरांच्या मनात त्यांची नावे दिलेल्या ह्यूजेस रोड, मेरवेदर रोड आणि बॅलार्ड ईस्टेट या ठिकाणांनी जपून ठेवली आहे.

काही जागांची नावे तेथे राहणाऱ्या एखाद्या नावाजलेल्या कुटुंबामुळे किंवा जमातीमुळे देखील दिली गेली आहेत. अठराव्या शतकात आंध्रमधून आलेले कामाटी करागीर व कामगार ज्या ठिकाणी वस्ती करून राहिले त्या वस्तीला कामाठीपुरा म्हणून ओळखले जाऊ लागले, त्याचप्रमाणे आगरी समाजावरून आग्रीपाडा हे नाव पडले. अशा प्रकारे इतर अनेक नावे नावारूपाला आली. भंडारी स्ट्रीट, भाटिया बाग, बोरा बाजार म्हणजे बोहरा बाजार, इस्लामपुरा, कुंभारवाडा ही नावेही त्या त्या जमातींवरून आली.

मुंबईच्या काही रस्त्यांची नावे पोलिस आयुक्तांवरूनही (Police Commissioner) पडलेली आहेत. मुंबईतला एक गजबजलेला भाग म्हणून अब्दुल रहमान स्ट्रीट ओळखला जातो. या भागात अब्दुल रहमान नावाच्या कोकणी मुसलमानाची मोठी मालमत्ता होती. त्याच्याच परिसरात भेडीच्या झाडाखाली बाजार भरे म्हणून तो भाग भेंडीबाजार बनला. त्यापलीकडची गुलालाची बाजारपेठ ती गुलाल वाडी बनली. याचप्रमाणे काही रस्ते आणि वाड्या ह्या तेथे राहणाऱ्या नामवंत व्यक्तीवरून ओळखल्या जाऊ लागल्या. उदा. पोपटवाडी, देवकरण नानजी वाडी, झावबावाडी, पाठकवाडी आणि गिरगावातील भट वाडी. गिरगावातील खोताची वाडी ही तेथे राहणाऱ्या ‘खोत’ कुटुंबाशी निगडित आहे. मुंबईत येणाऱ्या नवीन माणसाला या कडीत सोडून द्यायचे, त्याची अवस्था अभिमन्यूसारखी होते. तो आत जातो, पण बाहेर पडायचे हे त्याला उमगत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments