राजकारण

सदा सरवणकरांची टफ फाईट! पाडण्यासाठी ठाकरेंसह नाईक, देशपांडे मैदानात?

Sada Sarvankar : तुम्ही राजकारणाची अपेडट ठेवत असाल तर सदा सरवणकर हे नाव तुमच्यासाठी नवीन नसावं. शिवसेना भवन ज्या मतदार संघात आहे, त्या माहीम मतदार संघाचे आमदार आहेत, जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, त्या माहीम मतदार संघातून सदा सरवणकर हे जिंकून आलेत. पण हे सध्या शिवसेनेच्या दुसऱ्या गटात म्हणजेच शिंदे गटात असल्याने चर्चेत आहेत.

आता चर्चेत असण्याचं फक्त शिंदे गटात जाणं इतकंच कारण नाही, तर शिंदे गटात गेल्यापासून यांची वक्तव्य आणि कर्तव्यही तितकीच चर्चेत आहेत. शिवसेना भवन म्हणजे शिवसेनेचं मंदीर माणलं जातं, मात्र दुसरं शिवसेना भवन उभारण्याचं पहिलं वक्तव्य हे शिंदे गटातील सदा सरवणकर यांनीच केलं होतं.

गणपती विसर्जनावेळी सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी तर थेट शिवसैनिकांसोबतच राडा घातला होता. याच राड्यावेळी समाधान सरवणकर आणि संतोष तेलवणे यांनी पोलीस ठाण्यासमोर शिवीगाळ केली होती तर सदा सरवणकरांनी बंदूकीतून फायरिंग केली होती, असा आरोप शिवसेनेकडूनच केला जातोय. त्यामुळेच वंटास टीमने सदा सरवणकरांच्या निवडणुकीवर लक्ष घालण्याचा प्रयत्न केला आहे.

सदा सरवणकर हे शिंदे गटात असल्यामुळे त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचा गट, मनसे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जमल्यास भाजप पक्ष उभे राहण्याची शक्यता आहे. यासाठी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकू.

2019 मध्ये सदा सरवणकरांनी माहिम मतदार संघातून निवडणूक लढली होती. यावेळी शिवसेना – भाजपची युती होती. त्यामुळे यांच्या विरोधात भाजपने उमेदवार दिला नव्हता. सदा सरवणकरांचा 2019 च्या निवडणुकीत 61 हजार 223 मतांनी विजय झाला होता. तर यांच्या विरोधात उभे असलेल्या मनसेच्या संदीप देशपांडे यांना 42 हजार 609 मतं मिळाली होती. मनसे आणि शिवसेनेच्या वादात काँग्रेसनेही हा मतदार संघ लढला होता. या मतदार संघात काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना 15235 मतं मिळाली होती.

2019 चा विचार केल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी शिंदे गटातून माहिम मतदार संघातून निवडणूक लढवली. तर त्यांना पारंपारिक विरोधक म्हणून मनसे, काँग्रेस यांचा विरोध असणार आहे आणि या सगळ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही सदा सरवणकरांना तोडीसतोड उमेदवार दिला जाऊ शकतो.

माहीममध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यात थेट लढत होती. तुमच्या माहितीसाठी म्हणून 2019 मध्ये याच मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं, आकडेवारीत सांगायचं म्हणजे फक्त 47.10 टक्के मतदान या मतदार संघात झालं आहे.

आता जर सदा सरवणकर निवडणुकीच्या मैदानात उतरले तर त्यांना उद्धव ठाकरे, मनसे, काँग्रेस या तीघांशी लढावं लागेल. या लढाईत राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार दिला तर सदा सरवणकरांना अवघड जाऊ शकतो. पण एकनाथ शिंदे गटासोबत असल्याने आणि शिंदे गट – भाजपची युती असल्याने भाजपकडून सदा सरवणकरांविरोधात उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे.

जे समीकरण तुम्ही आता विधानसभा निवडणुकीसाठी सदा सरवणकरांच्या बाबतीत पाहिलं, असंच समीकरण समाधान सरवणकर यांच्यासाठी मुंबई मनपा निवडणुकीत होण्याची दाट शक्यता आहे. कारण मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments