एकदम जुनं

लालबागच्या राजाचे पाय जेव्हा मातोश्रीवर बाळासाहेबांकडे गेले होते…

देशभरातील अनेक भाविक मुंबईतल्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. आता मुंबईच्या गणपतीचा विषय निघाल्यावर त्या दहा दिवसात चर्चा असते ती फक्त लालबागच्या राजाची.

Lalbaugcha Raja History : मुंबईमध्ये गणेशोत्सव म्हटल्यावर वेगळं काही सांगायला नको. आपल्याला गणपतीच्या मोठ्या मुर्ती, अजब करणारं मंडपाचं डेकोरेशन, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लागलेली भक्तांची रांग अशा वेगवेगळ्या अंगाने मुंबईतील गणशेत्सोव चर्चेत असतो. फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील अनेक भाविक मुंबईतल्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. आता मुंबईच्या गणपतीचा विषय निघाल्यावर त्या दहा दिवसात चर्चा असते ती फक्त लालबागच्या राजाची.

वर्षभर एका गणपतीला मुंबईकर साकडं घालत असतात, तो म्हणजे सिद्धी विनायक, मात्र जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा गणेशगल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा, ही नावं प्रामुख्याने घेतली जातात. त्यातल्या त्यात अनेकांची पसंती असते ती म्हणजे लालबागच्या राजाची. अशातच लालबागच्या राजाचे पाय मातोश्री बंगल्यावर बाळासाहेबांकडे गेले होते, असं तुम्हाला सांगितलं, तर विश्वास ठेवणार नाही, पण हे खरं आहे.

मातोश्री हा बंगला महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचा फॅक्टर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हेच ते घर, जिथून अनेक राजकीय पक्षांना, राजकारण्यांना आणि अनेक विषयांना चालना मिळाली. याच बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे होते.

हा किस्सा समजून घेण्याआधी तुम्हाला सर्वात आधी नाना वेदक (Nana Vedak) यांचा इतिहास समजून घ्यावा लागेल. नाना वेदक हे लालबागच्या राजाचे सर्व दागिने बनवतात किंवा राजाचे दागिने पॉलिश करण्याचं काम नाना वेदक करतात.

नानांनी 2006 मध्ये पहिल्यांदा लालबागच्या राजाची सोनपावले बनवली होती. नारळांपासून संरक्षण करण्यासाठी लालबाच्या राजाला ही सोनपावलं घातली जातात. या पावलांचं काम लालबाग मंडळाला आवडलं आणि तिथून पुढे राजाची सर्व स्वर्णकामं ही वेदक करु लागले.

असंच काम सुरु असताना 2006 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा नाना वेदक यांना फोन आला. आपल्याला उतरल्या वयामुळे लालबागकडे जाता येत नाही, तर दर्शन घेण्यासाठी ती सोनपावलं दर्शनाला घेऊन येण्याचं आवाहन बाळासाहेबांनी वेदक यांना केलं आणि अशाप्रकारे लालबागच्या राजाचे पाय मातोश्रीवर पोहचले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments