भुक्कड
Wrap House in Mumbai : दादारमधलं व्रॅप हाऊस नेमकं आहे तरी कसं?
व्रॅप हाऊस हे दादरमध्ये असून यामध्ये आकांशा गुराफे आणि तिची आजी वेगवेगळे पदार्थ तयार करत असतात.

मुंबईतील भायखळा बकरी अड्डा येथे राहणारी आकांक्षा गूराफे 24 वर्षांची असून तिने मार्केटिंग मध्ये असलेली 35 हजारांची नोकरी सोडून स्वतःचं दादरमध्ये व्रॅप हाऊस सुरू केलं आहे.
लॉकडाऊन मध्ये ही संकल्पना सुचली. व्रॅप हाऊस सुरू होऊन सहा महिन्यांच्यावर कालावधी पूर्ण झाला आहे आणि यामध्ये आकांक्षासोबत तिची 73 वर्षांची आजी मदत करत असते.