छातीत दुखलं, चक्कर आली; तरीही अनिल देशमुखांनी… अखेर 1 वर्ष, 1 महिना, 27 दिवसांनी सूर्य पाहिला…

Anil Deshmukh Bail : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 28 डिसेंबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. 100 कोटी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली केंद्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत देशमुख होते. जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली सीबीआयची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर देशमुख बाहेर आले.
अनिल देशमुखांना जेव्हा हायकोर्टाने जामीन मंजूर केला, तेव्हा ‘जामीन रद्द करा’, हे सांगणारी याचिका सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याचं ठरवलं होतं, त्यासाठी हायकोर्टाकडे वेळही मागितला. हायकोर्टाने तब्बल दोनवेळा CBI ला वेळ दिला होता, मात्र या वेळेत अनिल देशमुखांच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. अखेर 28 डिसेंबर रोजी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या मात्र या सुनावणीनंतर CBI च्या तपासात कोणतीच घडामोड नसल्याने देशमुखांची जामीनावर सुटका झाली.
अनिल देशमुखांना नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. बराच काळ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ED त्या तपासानंतर देशमुखांची केस CBI कडे गेली होती.
अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवस तुरुंगात होते, यावेळी त्यांना अनेक शारिरीक व्याधींशीही सामना करावा लागला होता. समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2022 मध्ये अनिल देशमुख हे तुरुंगात असताना चक्कर येऊन पडले, त्यासोबतच त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
जेव्हा त्यांना या व्याधी जानवत होत्या, त्यावेळेस रुग्णालयात नेऊन त्यांचा ECG चेकअपही करण्यात आला होता.