लोकल

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन; Metro 2 A, Metro 7 बद्दल ‘या’ 5 गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (19 जानेवारी 2023 रोजी) मुंबईमध्ये येणार आहेत, ते मुंबईतल्या अनेक विकास कामांच उदघाटन करणार आहेत, सोबत मुंबईमध्ये मोठी सभा घेणार आहेत. त्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दल काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.

Metro 2A and Metro 7 Line Information :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यामध्ये गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन मुंबईतील मेट्रोच्या दोन लाईनने उदघाटन करणार आहेत. त्यामध्ये लाईन 2A आणि लाईन 7 च्या फेज II चे उदघाटन होणार आहे. या दोन्ही मेट्रो लाईन बांधण्यासाठी अंदाजे 12,600 कोटी रुपये खर्च झाले आहेत. (5 things you must know about Metro 2A and Metro 7 to be inaugurated by PM Narendra Modi in mumbai)

उद्घाटनानंतर या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना खूप मोठा फायदा होणार आहे. मुंबईच्या लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ट्राफिक कमी होण्यासाठी या मेट्रोंचा फायदा होणार आहे. मुंबईतील हे दोन रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.

नव्याने बांधलेल्या मेट्रो लाईन्सबद्दल तुम्हाला या 5 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.

1. मेट्रो लाईन 2A (पिवळी लाईन) (Mumbai Metro 2 A Yellow Line) ही पूर्णपणे अंधेरी पश्चिम भागात प्रवास करणार आहे. दहिसर पूर्व आणि डीए नगर (Dahisar to DN Nagar) या दोन स्टेशनला ही लाईन जोडली जाणार आहे. ही लाईन सुमारे 18.6 किमी लांब आहे. मेट्रो लाईन – 7 ही अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (Andheri East to Dahisar East) असा प्रवास करणार आहे. ही लाईन सुमारे 16.5 किमी लांब आहे. या दोन मेट्रो मार्गांचे इंटरचेंज हे गुंदवली स्थानकावर होणार आहे.

2. दोन्ही मेट्रो लाईन 20 जानेवारीला लोकांसाठी खुल्या असतील. लाईन 2A वरील पहिली मेट्रो अंधेरी पश्चिम स्थानकावरुन सकाळी 6 वाजता सुटेल, तर शेवटची मेट्रो रात्री 9.24 वाजता असेल. (Metro 2A Line Time table) त्याचप्रमाणे लाईन 7 ची पहिली मेट्रो सकाळी 5.55 वाजता गुंदवली स्थानकातून सुटेल तर शेवटची मेट्रो 9.24 वाजता सुटेल. (Metro 7 Line Time table)

3. या लाईनवर 3 किमीसाठी 10 रुपये प्रमाणे तिकीटाचे भाडे असणार आहे. मात्र 3 किमीनंतरच्या प्रवासासाठी अतिरिक्त रक्कम आकरली जाणार आहे. (metro 2a 7 tickets price)

4. या दोन्ही मेट्रो मार्ग मुंबईतील दोन महत्त्वाच्या रस्त्यांवरून जातात, म्हणजे लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. त्यामुळे या मेट्रो मार्गांवर दररोज अंदाजे तीन ते चार लाख प्रवाशांची वाहतूक अपेक्षिक आहे. या दोन मेट्रो सुरु झाल्यानंतर लोकल तसंच रस्त्यावरील वाहतून मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5. या मेट्रोचं संपूर्ण काम भारतात झालं आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गांची पायाभरणी करण्यात आली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकेंचं उदघाटन होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments