बोरिवली ते ठाणे, फक्त 20 मिनिटांत; 11 किलोमीटर बोगद्यातून भन्नाट प्रवास…
बोरिवली ते ठाणे या भुयारी मार्गाचे काम पावसाळ्याआधी सुरु होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

Borivali Thane Tunnel : मुंबईमध्ये लोकल, मेट्रो, मोनो अशा साधनांनी प्रवास करण्यासाठी मुंबईकर प्राधान्य देतात, मात्र रस्त्यावरची वाहतूक करणाऱ्यांमध्येही काही कमी नाही, त्यामुळे फक्त लोकल, मेट्रो, मोनो करुन मुंबईमधये चालणार नाही, त्यासाठी आपल्याला मुंबईचे रस्तेही मजबूत आणि शॉर्टकट करावे लागतील. याच शॉर्टकट रस्त्यांचा एक भाग म्हणजे बोरिवली ते ठाणे या दोन शहरांना जोडणारा रस्ता.
मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनात नोकरीसाठी मुंबईकरांना शेकडो मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो. त्यात मुंबईच्या रस्त्यांकडे पाहिलं तर ट्राफिकमध्ये मुंबईकर हैरान होऊन जातो. अशातच बोरिवली ते ठाणे मार्गावर एमएमआरडीएने मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
बोरिवली ते ठाणे किंवा ठाणे ते बोरिवली असा प्रवास करताना साधारण 1 ते 1.5 तास वेळ लागतो, तोच रस्ता फक्त 15 ते 20 मिनिटांत पूर्ण करू शकतो असा प्रोजेक्ट काही महिन्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी येणार आहे. बोरिवली-ठाणे या दोन शहरांच्या मध्ये 11 किलोमीटरचा दुहेरी बोगदा बांधला जात आहे.
ठाणे ते बोरिवली हे अंतर अंदाजे २४ किमी आहे. वाहतुकीमुळे बोरिवली ते ठाणे प्रवास करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतात. हाच वेळ एका बोगद्यामुळे कमी होणार आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून 11.8 किमी लांबीचा तर प्रत्येक भुयारामध्ये तीन मार्गिका अशा दोन्ही भुयारांमध्ये एकूण सहा मार्गिका असणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे 13,200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा बोगदा समुद्र सपाटीपासून 23 मीटर खाली (जमिनीमध्ये) असणार आहे.
एमएमआरडीए’कडून असा दावा केला जात आहे की या बोगद्याचे काम येत्या चार वर्षांत पूर्ण होऊ शकतं. तर 2023 च्या पावसाळ्याआधी या बोगद्याचे काम सुरु होईल. या बोगद्याच्या रस्त्यावर सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे, अग्निशामक उपकरणे, ले-बे एरिया इत्यादी अत्याधुनिक सुविधा असतील.