स्पोर्ट

असे खेळाडू, ज्यांनी मरणाच्या दाडेतून परत येऊन मैदान गाजवलंय

असे अनेक खेळाडू आहेत, जे मरणाच्या दाडेत जाऊन परत आलेत आणि त्यांनी मैदान गाजवलंय.

Indian Cricketer Accident : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याचा 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. रात्रीच्या अंधारात त्याचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो इतका गंभीर जखमी झाला की त्याच्या खेळावर प्रश्न केले जाऊ लागले.

ऋषभ पंतची तब्येत आता स्थिर आहे. या अपघातामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. पंतला या अपघातामुळे क्रिकेटमधून मोठा ब्रेक घ्यावा लागणार आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीशी जोरदार मुकाबला करत आहे. 8 ते 10 महिन्यांत तो पुन्हा मैदानात उतरू शकेल अशी अपेक्षा अनेकजण व्यक्त करत आहेत. मात्र असे अनेक खेळाडू आहेत, जे मरणाच्या दाडेत जाऊन परत आलेत आणि त्यांनी मैदान गाजवलंय.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही दिल्लीमध्ये 2018 मध्ये अपघात झाला होता, यावेळी त्याच्या डोळ्याला जोरदार मार लागला. या अपघातातून तात्काळ ठीक होऊन शमी पुन्हा मैदानात उतरला होता.

2003 साली श्रीलंकेचा फिरकीपटू कौशल लोकुराच्ची याचाही भिषण अपघात झाला होता. त्याच्या खांद्याला मोठी दुखापत झाली होती. हाह अपघात इतका गंभीर होता की या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. इतक्या भीषण अपघातातून तो बचावला आणि मैदानात परतला.

माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी याचा वयाच्या 20 व्या वर्षी जोरदार अपघात झाला होता. या अपघातात त्याची दूरदृष्टी कमी झाली होती, परंतू या सर्वावर मात करत त्याने पुन्हा क्रिकेट विश्वात पदार्पण केले.

भारताचा प्रसिद्ध खेळाडू साईराज बहुतुलेच्या पायात रॉड घालावा लागला होता इतका भीषण अपघात त्याचा झाला होता. साईराजच्या गाडीच्या अपघातात त्याचा एक मित्रही दगावला होती. यावेळी त्याच्या पायाचे ऑपेरश करुन त्यात रॉड घालण्याची वेळ आली होती. परंतू जिद्दीने पेटून उठलेल्या साईराजने पुन्हा क्रिकेट विश्वात कमबॅक केले.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा 2014 साली लंडन इथे अपघात झाला, यात त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र या अपघातामुळे काहीकाळ गावस्करांना खेळापासून लांब राहावं लागलं होतं.

असेच काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांचाही अपघात झाला होता मात्र त्यांनी पुन्हा एकदा भरारी घेत मैदान गाजवलं आहे. अपघातानंतरही पुन्हा एकदा भारतासाठी आणि आपल्या क्रिकेट विश्वात नाव कमावण्यासाठी जोरदार खेळी करत या खेळाडूंनी नवा विक्रम घडवून आणला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments