स्पोर्ट

महाराष्ट्र नाही, तर हॉकीला जिवंत ठेवण्यासाठी हे राज्य धडपड करतंय…

हॉकी हा जरी भारताचा राष्ट्रीय खेळ असला तरी तो जिवंत राहावा म्हणून त्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही.

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचा वर्ल्ड कप 13 जानेवारीपासून सुरू झालाय. एक वेळ अशी होती की या खेळात भारताचा दबदबा होता, पण गेल्या 47 वर्षात एकही वर्ल्ड कप जिंकता आला नाही. इतकंच नाही तर भारताने अखेरचा वर्ल्ड कप 1975 मध्ये जिंकला होता. त्यानंतर सेमीफायनलमध्येही पोहचू शकला नाही.

यासाठी संघाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला क्रिकेट वगळता इतर खेळांमध्ये कितपत रस आहे?

मधल्या काळात फिफा वर्ल्ड कप झाला. तेव्हा भारत यासाठी पात्र ठरला नसल्याच्या चर्चा झाल्या. हॉकीच्या भारताच्या मॅचेस कधी? कॅप्टन कोण? कोण चांगलं खेळतं याची किमान माहिती आपल्याला आहे का? गुगल न करता सांगता किती जणांना भारतीय हॉकी खेळाबद्दल माहिती देता येईल. मोजके लोक सोडले तर याचं उत्तर बहुतांश नागरिंकांना सांगता येणार नाही.

हॉकीच्या 100 वर्षाच्या इतिहासात भारताने सुरुवातीला एकहाती वर्चस्व गाजवलं. पण त्यानंतर हॉकीच्या मैदानात भारताची ओळख संपुष्टात येतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र पुन्हा एकदा भारतीय हॉकीला सोन्याचे दिवस येतील, अशी आशा निर्माण झाली आणि याचं श्रेय द्यायचं झालंच तर ते फक्त ओडिसाला द्यावं लागेल.

भारताच्या हॉकी संघासाठी पुढाकार घेतला तो ओडिशाने. यंदा सुरू झालेल्या हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन ओडिसात केले आहे. सलग दुसऱ्यांदा ओडिसा यजमानपद भूषवत आहे. गेल्या वर्षी भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. तेव्हा एका व्यक्तीची चर्चा झाली ती म्हणजे ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक. हॉकी इंडियाचा मुख्य स्पॉन्सर सध्या ओडिसा आहे. हॉकीसाठी जितकी मदत होऊ करता येईल तितकी ओडिसा सरकारने केली.

WWE ची मालकीण, ती म्हणेल तसंच होणार; नवराही WWE मध्ये, वडीलही WWE मध्येच

 

भारतीय हॉकीचा इतिहास

हॉकीत भारताने एक दोन नाही तर सलग 6 ऑलिम्पिक सुवर्ण पदकं जिंकण्याचा इतिहास घडवला होता. 1928 ते 1956 अशा सलग सहा ऑलिम्पिकमध्ये भारताने ही कामगिरी केली. त्यानंतर 1964 आणि 1980 मध्येही सुवर्ण पदक पटकावलं. त्यातच 1975 मध्ये हॉकी वर्ल्डकप मलेशियात झाला. तेव्हा अंतिम सामन्यात पाकिस्तानला 2-1 अशा गोल फरकाने भारताने विजय मिळवला होता. तेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व अजित पाल हे करत होते.

सुवर्णकाळ ते पदकांचा दुष्काळ

1928 ते 1980 असा सुवर्ण काळ अनुभवलेल्या भारतीय हॉकीला 2021 पर्यंत एकदाही पदक जिंकता आलं नाही. 1975 च्या वर्ल्ड कपपासूनचा काळ म्हणजे जवळपास चार तपांचा कालावधी झाला. यात भारतीय हॉकीला उल्लेखनिय कामगिरीच करता आली नाही. मात्र 2021 च्या अखेरीस भारतासाठी नव्या आशा निर्माण झाल्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ब्रॉन्झ मेडल जिंकून पदकाचा दुष्काळ संपवला.

असे खेळाडू, ज्यांनी मरणाच्या दाडेतून परत येऊन मैदान गाजवलंय

 

मूलभूत सुविधा

मधल्या काळात हॉकीच्या मैदानात आणि टॅक्टिजमध्येही बदल बघायला मिळाला. याचाही खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला. एस्ट्रो टर्फ दिसायला गवताच्या मैदानासारखे असले तरी त्याची पृष्ठभूमी ही गवताच्या तुलनेत खूपच सपाट असते. त्यामुळे गवताच्या मैदानावर असलेला वेग आणि टर्फवर मिळणारा वेग यात फरक पडला. याशिवाय भारताकडे अनेक सुविधांची कमतरता होती. टर्फची मैदाने नसने, हॉकी स्टिक्स लाकडी असायच्या. ऑलिम्पिकमध्ये भारत लाकडी हॉकी स्टिकने खेळत होता तर इतर देश कार्बन आणि फायबर ग्लासच्या स्टिक्स वापरत होते.

ओडिसामध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम

जगातील सर्वात मोठं स्टेडियम ओडिसातील सुंदरगढ जिल्ह्यात राउरकेला इथं आहे. 20 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमचे नाव बिरसा मुंडा यांच्या नावाने आहे. याशिवाय भुवनेश्वरच्या कलिंगमध्येही हॉकी वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. हॉकीत ज्या ज्या गोष्टींची कमतरता होती त्या भरून काढण्याचं काम ओडिसाने केलं.

ओडिसा राज्य हॉकी इंडियाचे स्पॉन्सर

नवीन पटनायक यांच्या सरकारने फक्त राज्यातच नव्हे, तर देशाच्या हॉकी संघाची मदत केली. ओडिसा सरकार भारताच्या हॉकी संघाच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांची स्पॉन्सर आहे. ऑलिम्पिकमध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही स्पॉन्सरशिप २०३३ पर्यंत वाढवली गेली. फक्त स्पॉन्सरशिपच दिली असं नाही, तर ओडिशात आता वर्ल्डकप सामना दाखवण्यासाठी विशेष अशी तयारीसुद्धा केलीय. राज्यातील जवळपास 7 हजार ग्रामपंचायतींमध्ये एलईडीच्या माध्यमातून सामने दाखवण्यात येणार आहेत.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments