तंदुरी वडापावची खास झलक, चटकदार वडापाव नेमका आहे तरी कसा, कुठे मिळतो?
तंदुरी वडापावची चव कशी आहे, चटकदार वडापाव नेमका आहे तरी कसा, हा वडापाव कुठे मिळतो, हे सांगणारा आमचा हा खास रिपोर्ट नक्की पाहा.

Most Famous Tandoor Vada Pav : मुंबईला कोणाच्या ओळखीची गरज नाही, कारण मुंबई म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या, मात्र असा एक पदार्थ आहे, ज्याच्या नावावरुन मुंबईला ओळखलं जातं. ते नाव म्हणजे वडापाव. ‘मुंबईचा वडापाव’ हे दोन शब्द नेहमी लोकांना मुंबईबद्दल खास सांगून जातात, आजदेखील आपण अशाच एका खास वडापावबद्दल जाणून घेणार आहोत.
ठाणे पूर्व इथल्या अष्टविनायक चौकात एक अप्रतिम वडापाव मिळतो, ज्याचं नाव आहे तंदुरी वडापाव. फक्त 40 रुपयांमध्ये मिळणाऱ्या या तंदूरी वडापावला खाण्यासाठी लोकं खूप लांबून येत असता, कारण या वडापावची चवही तशीच खास आहे. आधी साध्या पद्धतीने वडा तळून घेणे, पावामध्ये अनेकप्रकारचा मसाला घालणे, त्यानंतर तंदुरीवर तो वडा, पाव भाजणे आणि खवय्यांना देणे, अशा या पद्धतीने या वडापावची रचना ठरलेली असते, आता हा नेमका वडापाव असतो कसा, या वडापाव बणवणाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि वडापाव खाणाऱ्यांना या वडापावाबद्दल काय वाटतं, हे ऐकण्यासाठी पुढील व्हिडीओ नक्की पाहा.