
Mukesh Ambani House : भारतातील सर्वात श्रीमंत म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि जे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत अशा मुकेश अंबानींच्या बंगल्याबद्दल जाणून घेणार आहोत. मुकेश अंबानींचा बंगला मुंबईत असून त्या बंगल्याचं नाव अँटेलिया असं आहे. उधुनिक काळातला राजवाडा, महाल किंवा कोणतीही उपमा याला तुम्ही देऊ शकता.
फक्त बोटावर मोजण्याइतके सदस्य या घरात राहतात मात्र या घरातल्या सदस्यांची सेवा करण्यासाठी हजारो नोकर आहेत, ज्यांच्या पगाराबद्दल आपण पुढच्या लेखात बोलू. संपूर्ण कुटुंबासह मुकेश अंबानी याच बंगल्यामध्ये राहतात. चक्क 27 मजल्याच्या हा बंगल्यामध्ये शेकडो गाड्यांचे पार्किंग, एक चित्रपटगृह, शेकडो खोल्या, नोकरांना राहण्यासाठी खोल्या, गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटर, व्यायम करण्यासाठी जीम, योगारूम, स्विमिंग पूल, एका मजल्यावर गार्डन अशा रोज गरजेच्या असणाऱ्या गोष्टी इथं आहेत. महत्त्वाचं म्हणजे या बंघल्याच्या टेरेसवर हेलीपॅडदेखील आहे. अशा १० गोष्टींवर मुकेश अंबानी यांनी भर दिला आहे.
असं म्हटलं जातं की मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलांना गाड्यांचा खूप शॉक आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या गा ड्या, त्यांच्या घरात आहेत. अँटेलिया बंगल्याचे पहिले सहा मजले हे फक्त गाडी पार्किंगसाठी वापरण्यात येतात. एका वेळी 160 गाड्या या बंगल्यामध्ये पार्क करू शकतो, इतकी सोय आहे. या बंगल्यामध्ये गाड्यांसाठी एक सर्विस सेंटरदेखील उपलब्ध आहे.
अंबानी ज्यावेळी त्यांच्या नवी मुंबई इथल्या जिओ सेंटरला जातात, मुंबईतील एअरपोर्टला जातात तेव्हा गांड्यापेक्षा हेलिकॉप्टरचा वापर करतात. अशी माहिती आहे की या घरातील लिफ्टचा वापर करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला जातो. ज्यांच्याकडे हे स्कॅनर आहे, तेच लोक या लिफ्टचा वापर करु शकतात. अंबानींचे सर्व कार्यक्रम करण्यासाठी अँटेलिया बंगल्यामध्यये एक मोठा हॉलदेखील आहे.
जेवण बनवणे, कपडे धुणे, साफसफाई करणे, जेवण वाडणे, बंगल्यातील पाळी प्राण्यांची देखभाल करणेर, बंगल्यात असलेल्या बागेची देखबाल करणे अशा सर्व कामांसाठी 600 हून अधिक नोकरवर्ग आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या बंगल्यामध्ये मोठं मंदिर देखील आहे, ज्या मंदिरांची पूजा करण्यासाठीही अनेक पंडित असतात.
अँटेलिया बंगल्याचं बांधकाम 2010 मध्ये पूर्ण झालं. त्यावेळी हे घर बांधण्यासाठी तब्बल 11000 कोटी रुपये खर्च आला होता. ही माहिती तुम्हाला छान वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका.
View this post on Instagram
मुकेश अंबानींच्या घराची संपूर्ण माहिती (Mukesh Ambani House – Key Features of Antilia)
घराचं नाव – अँटेलिया
घराचे ठिकाण – अल्टामाउंट रोड, मुंबई
क्षेत्र (चौरस फूट) – ४,००,००० चौ.फूट
घराची किंमत 2010 साली – 10,000 कोटी अंदाजे
एकूण फ्लोअर्स – 27
बांधकाम 2006 मध्ये सुरू झालं – 2010 मध्ये संपलं
वास्तुविशारद आणि डिझायनर – पर्किन्स आणि विल आणि हिर्श बेडनर असोसिएट्स
अँटिलिया नाव का ठेवलं – फँटम आयलंडच्या नावावरुन अँटेलिया हे नाव ठेवलं
घरातील एकूण कर्मचारी – एकूण 600 हून अधिक कर्मचारी काम करतात
गाड्यांच्या पार्किंगसाठी – घरातील 6 फ्लोअर पार्कींगसाठी आहेत.
View this post on Instagram