लोकल

Mumbai Metro -3 ची संपूर्ण माहिती, स्थानकांपासून खर्चापर्यंत, आतापर्यंत काय काय घडलं?

मेट्रो लाईन - 3 ही कुलाबा-वांद्रे सिप्झच्या बाजूने जाणारी 33.5 किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो आहे.

Mumbai Metro Line 3 update : राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो म्हणून याकडे पाहिलं जात या मेट्रोचं सर्वाधिक काम पूर्ण झालं आहे, डिसेंबर 2023 च्या दरम्यान या मेट्रोचा पहिला टप्पा म्हणजेच 17 स्थानके मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. या मेट्रो लाईनवर असलेल्या सर्व 27 स्थानकांची उभारणी जोरदार सुरु असल्याचंही दिसून येत आहे. पश्चिम मुंबईकडून उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या 33.50 किमी मेट्रोला अंदाजित खर्च 37 हजार कोटी आल्याची माहिती आहे.

आता या मेट्रोची ठळक वैशिष्ट्ये पाहा :

मेट्रो लाईन – 3 ही कुलाबा-वांद्रे सिप्झच्या बाजूने जाणारी 33.5 किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो आहे.

या कॉरिडॉरचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी ही लाईन 2023 मध्ये लोकांच्या सेवेसाठी येऊ शकते.

आठ डब्यांची एक मेट्रो अशाप्रकारे आंद्र प्रदेशातील अल्स्टॉम प्लांटमध्ये या मेट्रोचा साचा तयार करण्यात आला आहे.

MMRC च्या माहितीनुसार या लाईनवर 54.5 किमी अप आणि डाउन प्रमाणे बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. या लाईनसाठी 2,86,000 घनमीटर काँक्रीट आणि 29,500 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आल्याची माहितीही MMRC म्हणजेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.

या लाईनवर एकूण 27 स्थानके आहेत – कफ परेड, विधान भवन, चर्चगेट स्टेशन, हुतात्मा चौक, सीएसटी स्टेशन, कळबादेवी, गिरगाव स्टेशन, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान भवन, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक मंदिर, दादर, शीतलदेवी मंदिर, धारावी, आयकर कार्यालय बीकेसी, विद्यानगरी, डोमेस्टिक विमानतळ, सहार रोड, अंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआईडीसी स्टेशन, सीप्ज़, आरे कॉलोनी (शेवट)

नक्शा विवरण स्वचालित रूप से उत्पन्न

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments