Uncategorized

नव्या पिढीतील ‘या’ सेलिब्रिटींची कमाई ऐकून तुम्हालाही येईल चक्कर

नव्या पिढीतील अभिनेते आणि अभिनेत्रींची कमाई किती? आकडे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Celebrity Kids Net Worth : हिंदी सिनेमा सृष्टीत नवीन पिढीचा चांगलाच गाजावाजा दिसत आहे. तर याच नवीन पिढीतील अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी आपल्या करिअरच्या सुरुवातीस चांगलीच कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे नवीन पिढीचे सेलिब्रिटी, ज्यांची कमाई ही कोट्यावधींमध्ये आहे.

अभिनेत्री सारा अली खान (actress sara aali khan) म्हणजेच नवा परिवारातील सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी. सारा अली खान या अभिनेत्रीने सर्वात कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. साराला आपल्या चित्रपटात घेण्यास अनेक दिग्दर्शक उत्सुक असतात. कोणत्याही चित्रपटात काम करण्यासाठी सारा पाच ते सात कोटी रुपये मानधन आकारते. आज साराचे वय 27 वर्ष असून जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये संपत्ती आहे.

ईशान खान हा शाहिद कपूरचा धाकटा भाऊ आहे. ईशान कपूरने जानवी कपूर सोबत धडक या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ईशानच्या अभिनयाची आणि डान्सची सतत सोशल मीडियावर खूप चर्चा असते. तो प्रत्येक चित्रपटासाठी 60 ते 70 लाख रुपये मानधन घेतो. कॅटरिना कैफ व सिद्धांत चतुर्वेदी सोबत फोन भूतमध्ये दिसला होता . ईशानची संपत्ती आता अकरा ते पंधरा कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

अभिनेत्री अनन्य पांडे बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनन्या पांडेचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनन्या पांडेला सोशल मीडियावर खूप ट्रोल ही केलं जात. अनन्य पांडेने करण जोहरच्या बॅनरमध्ये तयार झालेल्या ‘स्टुडिओ ऑफ द इयर टू’ चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे. अनन्या पांडेला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. नुकतचं आपण अनन्या पांडेला विजय देवकोंडाच्या चित्रपटामध्ये पाहिलं आहे. अनन्या ही प्रत्येक चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रुपये मानधन घेते. तिची संपत्ती 35 ते 40 कोटी रुपये इतकी आहे.

आपल्या सर्वांनाच माहिती की जानवी कपूर ही श्रीदेवी यांची मुलगी आहे. जानवीने आपल्या करिअरची सुरुवात ही पहिल्या चित्रपट ‘धडक’ या चित्रपटापासून केली आहे. त्यानंतर जानवी कपूरला चित्रपटांची ऑफर देखील आल्या. त्यामध्ये गुडलक जेरी व मिनी हे तिचे चित्रपट देखील रिलीज झाले. जानवी एका चित्रपटासाठी तीन ते सहा कोटी रुपये मानधन घेते. कपूरचे संपत्ती जवळजवळ 66 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

अहान हा सुनील शेट्टीचा मुलगा आहे. गेल्यावर्षी त्यांने ‘आरएक्स १००’ या तेलगू या चित्रपटामधूल बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अहानला या चित्रपटासाठी ९० लाख रुपये मानधन मिळाल्याचे सांगितलं जात आहे. अहानची संपत्ती 28 ते 32 कोटी रुपये असल्याचा दावा देखील केला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments