WWE ची मालकीण, ती म्हणेल तसंच होणार; नवराही WWE मध्ये, वडीलही WWE मध्येच
आपल्या वडिलांचाच वारसा पुढे चालवणारी स्टेफनी ही डब्ल्यूडब्ल्यूईची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे.

WWE म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये अनेक दिग्गज एकमेकांविरोधात फाइट करताना दिसतात. पण हे सगळं स्टेफनी मॅकमहन हिच्या इशाऱ्यावर चालतं. आपल्या वडिलांचाच वारसा पुढे चालवणारी स्टेफनी ही डब्ल्यूडब्ल्यूईची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही स्टेफनी मॅकमहन कोण, तर स्टेफनी ही गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या टॉप बिझनेस वुमनपैकी एक आहे. २०२२ हे वर्ष डब्ल्यूडब्ल्यूईसाठी जबरदस्त राहिलं आहे. तर विन्स मॅकमहन यांची मुलगी स्टेफनी ही WWE च्या सीईओपदी कायम आहे. WWE मध्ये जे काही घडतं ते स्टेफनीच्या इशाऱ्यावरच होतं असं म्हटलं जातंय. तिच्या परवानगीशिवाय यात काहीच होत नाही.
स्टेफनीला हे अचानक मिळालेलं नाही. लहानपणापासून यासाठी तिने धडे गिरवले. लहान वयातच तिनं रेसलिंग सुरू केलं होतं. सध्या अभिनयाच्या जगतातला बादशहा असलेला द रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन हा WWE चा स्टार रेसलर आहे. त्याला रिंगमध्ये स्टेफनीने कानशिलात लगावली होती. आजही WWEच्या चाहत्यांना ही घटना लक्षात आहे. स्टेफनी तरुण असताना जॉन सिनासोबतची लढत लोकांना आवडली होती. WWEमध्ये स्टेफनी २००३पासून सक्रीय आहे. आता ती WWEची अध्यक्ष आहे. अधून मधून ती रिंगमध्येही उतरते.
स्टेफनीचे वडील विन्स मॅकमोहन हे WWEचे संस्थापक आहेत. तर स्टेफनीचा पती ट्रिपल एच दिग्गज रेसलर आहे. सध्या ट्रिपल एच WWEमध्ये चिफ कंटेंट ऑफिस हेड ऑफ क्रिएटिव्ह म्हणून काम करतो.
स्टेफनीसोबत लग्न करण्याआधी ट्रिपल एचचे रेसलर चायनासोबत अफेअर होते. पण रेसलर चायनाला मुलं आवडत नसल्यानं दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. ट्रिपल एच चायनाच्या आई वडिलांसोबत वेळ घालवायचा. मात्र चायनाला ही बाब खटकत असे. तिने आपल्या मित्रांना असंही सांगितलं होतं की, ट्रिपल एचच्या सुटकेसमध्ये स्टेफनीचं लव्ह लेटर मिळालं होतं.
WEE मध्ये स्टेफनीने 1998 मध्ये अधिकृत सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा WWE प्रोग्रॅमिंगमध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ती दिसली होती. वयाच्या नवव्या वर्षी स्टेफनी त्या मुलींपैकी एक होती जी हॅलोवीनवेळी रेसलर रॉडी पायपरसोबत सहभागी झाली होती.