आपलं शहर

डोक्याला हात माराल असा मुंबईतला 16 किमीचा समुद्री ब्रीज, ‘देशातला पहिला ब्रीज’

तर विषय आहे आपल्या वंटास मुंबईचा... याच वंटास मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सुरु आहेत, त्यातल्या एका प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत...

Longest Sea Bridge in India : जगाच्या पाठीवर मुंबईबद्दल असंख्य गोष्टी तुम्हाला ऐकायला आणि पाहायलाही मिळतील, इथले अनेक अजब करुन सोडणारे किस्सेही कमी नाहीत, अशातच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय अशी गोष्ट, जी तुम्हाला आश्चर्य करुन सोडेल की मुंबईमध्ये असं काहीसं काम सुरु आहे.

मुंबईत दिवसेंदिवस लोकांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढत चाललेय, जितके लोक मुंबई सोडून जात आहेत, त्याच्याहून अनेक लोकं मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आणि लाईफ सेट करण्यासाठी येत आहेत. मुंबईमध्ये लोकं फिरण्यासाठी कमी आणि नोकरी करण्यासाठी जास्त येत असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे इथल्या दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे.

आता नवी मुंबईबद्दलही थोडंसं जाणून घ्या. नवी मुंबई हा मुंबईचाच एक भाग असल्याचं समजून घ्या, ज्यांना मुंबईमध्ये परवडणारी घरं मिळत नाहीत, असे अनेकजण नवी मुंबईमध्ये राहायण्यासाठी येत असतात. आता ही गोष्ट सगळ्यांसाठी लागू होत नाही, अनेकजाणांना मुंबईमध्ये राहायचं नाही, अनेकजण आधीपासूनच नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. म्हणजे काम मुंबईमध्ये आणि राहणं नवी मुंबईमध्ये. मात्र आतापर्यंत या दोन्ही शहरांना जोडणारा एकही थेट रस्ता नाही. तु्म्हाला मुंबईतून नवी मुंबईला जायचं असेल तर ट्रेन नाहीतर ट्राफीकने भरलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागतो.

अशातच एका नव्या प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे. देशातील सगळ्यात मोठा समुद्री मार्ग मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याचं काम करणार आहे. तो मार्ग म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक प्रोजेक्ट.

याच मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक प्रोजेक्टची खासियत काय आहे आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना काय फायदा होणार आहे, हेच आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. व्हिडीओची सुरुवात कऱण्याआधी आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन आला असाल तर सगळ्यात आधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरु नका….

मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकचा पूर्ण प्रोजेक्ट 22 किलोमीटरचा असणार आहे. यात 16.6 किलोमीटरचा ब्रीज हा समुद्रावर असणार आहे. बाकीचा 5.5 किलोमीटरचा रस्ता जमिनीवर असणार आहे. या ब्रीजचं काम MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रो पॉलिटन रिजन डेव्होलपमेंट ऑथोरिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. MMRDA ने या प्रोजेक्टचं काम वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं आहे, जेणेकरुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल.

16.6 किलोमीटरच्या ब्रीजचे ३ भाग करू, त्या ब्रीजच्या फेज १ मध्ये शिवडीजवळच मल्टीलेव्हल इंटरचेंज फॅसिलीट तयार केली जात आहे. ज्यामुळे या ब्रीजच्या आजूबाजूला असलेल्या भांगामधील नागरिकांना या ब्रीजचा वापर करता येईल. या फेजचं काम १० किलोमीटरचं असणार आहे. ही फेज बांधण्यासाठी ६.६०० करोड इतका खर्च आला आहे. या फेजचं कॉन्ट्रॅक्ट लार्सेन आणि ट्युब्रो कंपनीसह जपानी कंपनी आयएचआय कंपनीला देण्यात आलंय. ज्या दोघांनी मिळून या फेजला पूर्ण केलं आहे.

आता विषय आहे या ब्रीजच्या दुसऱ्या फेजचा. या फेजमध्ये टाटा प्रोजेक्ट आणि डायवो कंपनी एकत्र येऊन काम करत आहे. 7.8 किलोमीटरची ही दुसरी फेज बनवण्यासाठी ४.९०० करोडचा खर्च आला आहे. एमटीएचएनपासून शिवाजी नगर असा ब्रिज या फेजमध्ये होणार आहे.

शेवटच्या आणि तिसऱ्या फेजचं कामही लार्सेन आणि ट्युब्रो कंपनीक़डे देण्यात आलंय. जी फेज फक्त ३.६ किलोमीटरची असणार आहे. शिवाजीनगरपासून व्हर्डिएक्ट सेक्शन बनवण्याचं काम ही कंपनी करणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा देशातला पहिला असा ब्रीज होणार आहे ज्यावर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक टेक्निकल सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. या ब्रीजवरील ४ किलोमीटरचा हिस्सा प्युअर स्टीलने बनवला जाणार आहे.

या ब्रीजचं अर्ध्याहून जास्त काम पूर्ण झालेलं आहे. लवकरच हा ब्रीज प्रवाशांसाठी वापरायला सुरु केला जाऊ शकतो. अनेक अभ्यासकांच्या मते ब्रीजचा वापर सुरु झाल्यानंतर मुंबईमधील अर्ध्याहून अधिक ट्राफिक कमी होऊ शकतं. कारण मुंबईहून नवी मुंबईला जाताना मोठ्या प्रमाणात ट्राफिकचा सामना करावा लागतो. मित्रांनो असेच व्हिडीओ पाहण्यासाठी आणि त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला मिळणाऱ्यासा्ठी आमच्या youtube चॅनेलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरु नका. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments